प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या 18 व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर 5 ऑक्टोबरला वर्ग होईल. पंतप्रधान किसान सन्मान योजनेच्या 18 व्या हप्त्याचं वितरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते केलं जाईल. 18 व्या खात्याची रक्कम येत्या 5 ऑक्टोबरला जारी करण्यात येणार असल्यासंदर्भातील माहिती पीएम किसानच्या वेबसाईटवर देण्यात आली आहे.

लाभार्थी यादीत असे तपासा नाव

  1. सर्वप्रथम तुम्हाला पीएम किसान सन्मान निधी (https://pmkisan.gov.in/) च्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल.
  2. यानंतर तुम्हाला पोर्टलवर दिसत असलेल्या नो युवर स्टेटसचा पर्याय निवडावा लागेल.– नोंदणी क्रमांक टाकावा लागेल. तुमच्याकडे नोंदणी क्रमांक नसेल तर Know your registration no या पर्यायावर क्लिक करा. यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर आणि कॅप्चा टाकावा लागेल. आता तुम्हाला एक OTP मिळेल. OTP टाकल्यानंतर तुम्हाला नोंदणी क्रमांक कळेल.
  3. नोंदणी क्रमांक टाकल्यानंतर तुम्हाला तुमची स्थिती कळेल.
  4. तुम्हाला तुमच्यासोबत तुमच्या गावातील लोकांची नावे पाहायची असतील, तर तुम्हाला पीएम किसान पोर्टलवर जाऊन लाभार्थी यादीचा पर्याय निवडावा लागेल.
  5. यानंतर तुम्हाला तुमचे राज्य, जिल्हा, ब्लॉक आणि गावाचे नाव टाकावे लागेल.
  6. आता तुम्ही लाभार्थी यादी डाउनलोड करू शकता आणि तुमच्या नावासह गावातील आणखी कोणाला या योजनेचा लाभ मिळत आहे ते पाहू शकता.

 

👉 लाभार्थी यादीत नाव तपासा 👈