शेतकऱ्यांसाठी खूशखबर! केंद्राकडून 13 हजार 960 कोटींच्या 7 योजनांना मंजुरी, पहा पूर्ण योजनांची माहिती Shetkari Yojana

Shetkari Yojana

केंद्राकडून 13 हजार 960 कोटींच्या 7 योजनांना मंजुरी
👉 येथे क्लिक करून योजनांची माहिती पहा 👈

 

Shetkari Yojana : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कॅबिनेट बैठकीत कृषी क्षेत्राच्या विकासासाठी आणि शेतकऱ्यांच्या जीवनमानाचा दर्जा उंचावण्यासाठी मोठा निर्णय घेण्यात आला. शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्यासाठी 7 योजनांना मंजुरी देण्यात आली. डिजिटल कृषी मिशन, अन्न व पोषणघटकांच्या सुरक्षेसाठी कृषी विज्ञान, कृषी शिक्षण, व्यवस्थापन, सामाजिक शास्त्रांना भक्कम करणे,शाश्वत पशुधनाचं आरोग्य आणि उत्पादन,फळशेतीचा शाश्वत विकास, कृषी विज्ञान केंद्राला प्रोत्साहन, नैसर्गिक साधन संपत्तीचं व्यवस्थापन अशा सात योजनांना केंद्र सरकारनं मंजुरी दिली आहे.

 

केंद्राकडून 13 हजार 960 कोटींच्या 7 योजनांना मंजुरी
👉 येथे क्लिक करून योजनांची माहिती पहा 👈

 

केंद्र सरकारच्या कॅबिनेट बैठकीनंतर केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी याबाबत माहिती दिली. आजच्या कॅबिनेट बैठकीत शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्यासाठी 7 मोठे निर्णय घेण्यात आल्याचं त्यांनी म्हटलं. डिजिटल कृषी मिशन अंतर्गत शेतकरी नोंदणी, ग्रामीण जमीन नकाशा नोंदणी, पीक पेरा नोंदणी, कृषी निर्णय आधारभूत यंत्रणा, दुष्काळ आणि पूर नियंत्रण, हवामान, सॅटेलाईट डाटा, भूमिगत पाणीसाठ माहिती, पीक विमा या बाबींवर काम केलं जाईल. शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळवून देण्याबाबत, खरेदीदार उपलब्ध करुन देण्याबाबतच्या सुविधा याबाबत उपलब्ध केल्या जातील Shetkari Yojana.

 

केंद्राकडून 13 हजार 960 कोटींच्या 7 योजनांना मंजुरी
👉 येथे क्लिक करून योजनांची माहिती पहा 👈

 

अन्न व पोषणघटकांच्या सुरक्षेसाठी कृषी विज्ञान याद्वारे संशोधन आणि शिक्षण, कडधान्य आणि तेलबियांच्या विकासासाठी प्रयत्न करणे, गवतवर्गीय पिकांचा विकास, नगदी पिकांचा विकास करणे. या योजनेद्वारे शेतकऱ्यांना 2047 पर्यंत वातावरणीय बदलांना सामोरं जाण्यासाठी तयार करणे आणि अन्न सुरक्षा पुरवणे. कृषी क्षेत्रातील विद्यार्थी आणि संशोधकांना शेती आणि शेतकऱ्यांसमोर सध्याच्या आव्हांनावर काम करण्यासाठी 2291 कोटी रुपयांची योजना सुरु करण्यात आली आहे. याद्वारे नव्या शिक्षण धोरणानुसार कृषी शिक्षण आणि संशोधनाचं आधुनिकीकरण, नव तंत्रज्ञानाचा वापर, डीपीआय,एआय, बिग डाटा, नैसर्गिक शेती याला भारतीय कृषी संशोधन परिषदेद्वारे प्रोत्साहन देणे. फळबाग शेतीच्या शाश्वत विकासासाठी 860 कोटी रुपयांच्या योजनेला मंजुरी देण्यात आली आहे Shetkari Yojana.

Leave a Comment